शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण

  45

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. शिंदे बुधवारच्या रात्रीपासूनच दिल्लीत आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजनाच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दिवाळीनंतर मुंबई महापालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी करायच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उद्धव आणि राज युती करणार की नाही आणि युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. काही खासगी संस्थांच्या सर्व्हेचे रिपोर्ट घेऊन शिंदेंनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मागील काही दिवसांत शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे नवनवे वाद निर्माण झाले. हे वाद मिटवावे आणि भविष्यात नवे वाद होऊ नये यासाठी घ्यायच्या काळजीबाबतही एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार