US Russia curde: खळबळजनक! भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत युएस ५००% टेरिफ लावणार?

प्रतिनिधी: खळबळजनक! युएस सिनेटमध्ये रशियाकडून कच्चे तेल विकत घेत असलेल्या राष्ट्रांवर ५०० टक्के कच्चे तेल अतिरिक्त टेरिफ लावावे यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर रिचर्ड ब्लूमेंथल, रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी मांडले आहे. 'The sanctioning Russia Act of 2025' नावाचे वादग्रस्त विधेयक या सिनेटरने युएसमध्ये मांडले आहे. त्यामुळे जर हे विधेयक(Bill) संसदेत मंजूर झाले तर रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यात येणाऱ्या राष्ट्रांवर ५००% अतिरिक्त शुल्क अमेरिकेकडून आकारणी केली जाऊ शकते.

अमेरिकेचे व रशियाचे शीतयुद्ध नवे नाही. रशियाने युक्रेनशी युद्ध केल्याने, तसेच अमेरिका व रशियातील वैचारिक मतभेद असल्यामुळे अमेरिका ही नवी चाल खेळू शकते. भारत प्रामुख्याने रशियाकडून कच्चे तेल आयात करतो. रशियातील कच्चे तेल किफायतशीर दरात मिळते. रशिया युक्रेन युद्धातनंतरही भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केले होते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने विकसनशील देशांना फटका बसण्यासाठी नवी चाल खेळली जात असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलले जात आहे.

माहितीनुसार, भारताबाबत बोलायचे झाले तर भारतातील एकूण तेल आयातीपैकी रशियाकडून ३५% टक्के तेल येते. मात्र या विधेयकाचे भवितव्य आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम केवळ काँग्रेसमधील चर्चेवर अवलंबून नाहीत तर अमेरिकेचे अध्य क्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अवलंबून आहेत जे विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपावर तितकेसे समाधानी नाहीत. रशियावर पूर्णपणे निर्बंध घालण्यापेक्षा फारकत घेऊन हा प्रस्तावित कायदा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारी राष्ट्रांपुरता म र्यादित आहे त्यामुळे ट्रम्प याबद्दल अनुकुल नाही अंतिम निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेऊ शकतात.

ट्रम्प यांनी जाहीरपणे या विधेयकाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'हा पूर्णपणे माझा पर्याय आहे,'असे त्यांनी अलीकडेच उडते उत्तर पत्रकारांना दिले आहे. ट्रम्प यांची ही प्रसारमाध्यमांना दिलेली गुगली आहे जी स्वारस्य आणि अस्पष्टता दोन्हीही स्पष्टपणे अधोरेखित करते. वृत्तांनुसार, जर ट्रम्प यांना विधेयकाच्या अंमलबजावणीवर जवळजवळ पूर्ण नियंत्रण मिळाले तर ते या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास तयार आहेत असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.

त्यामुळे एकूणच हे बील पारित झाल्यास भारतासह रशियाकडून कच्चे तेल घेणारी राष्ट्रे अडचणीत येऊ शकतात. रशिया समर्थक राष्ट्रांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.
Comments
Add Comment

बँड बाजा बारातपासून धुरंधरपर्यंत: रणवीरचा अविस्मरणीय चित्रपट प्रवास

हिंदी सिनेमाला नवी दिशा देणारा अभिनेता: रणवीरच्या यशाची १५ वर्षांची गाथा गेल्या १५ वर्षांपासून रणवीर सिंग हे

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री

Dhurandhar Viral Song : "अक्षय शूटिंगदरम्यान छोटा सिलेंडर घेऊनच फिरत होता";कोरिओग्राफरने सांगितला किस्सा

  मुंबई : अक्षयचे एन्ट्री सॉन्ग असलेले 'FA9LA,बहरीनच्या हिप-हॉप स्टार फ्लिपराची याने बनवले आहे,तर या गाण्याची

Dhurandhar viral Dance Step : अक्षय खन्नाने अख्खं मार्केट गाजवलं! अक्षय खन्नाला कशी सुचली ही डान्स स्टेप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने धूरंधर या चित्रपटात फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार

आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या