share market marathi : सकाळच्या सत्रात 'Flat' कल VIX स्थिर तरीही दबाव कायम? 'ही' कारणे जबाबदार, सेन्सेक्स व निफ्टी कोसळला !

  60

मोहित सोमण: गिफ्ट निफ्टीतील घसरणीनंतर नकारात्मक संदेश मिळाला होता. ज्यातून आज पुन्हा बाजारातील घसरणीची अपेक्षा आहे. सकाळी सत्र सुरू होताच सेन्सेक्स १८१.९२ अंकाने घसरला आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ४३.८५ अंकाने घसरण झाली आहे. मुख्यतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल उशीरा, १ ऑगस्टपासून कॅनडावर ३५% टेरिफ शुल्क आकारण्याची घोषणा केली. ज्याचा फटका आशियाई बाजारात देखील बसला आहे. ज्यामध्ये आशिया बाजारातील वातावरण संमिश्र आहे. त्यांचे कारण बँक ऑफ कोरियाने रेपो दरात कपात केल्यामुळे गुरूवारी बाजारात समाधानकारक वाढ झाली होती. ट्रम्प यांनी केवळ कॅनडा नाही तर अन्य व्यापारांवरही १५ ते २०% ब्लँकेंट टेरिफ लावण्याचे घोषित केले. आजही भारतीय व्यापारातही दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांचा फटका गिफ्ट निफ्टीत दिसला.

सेन्सेक्स मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये ०.०६%,०.१८% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९%, ०.०१% वाढ झाली आहे. प्रामुख्याने सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८१.९८ अंकाने वाढ झाली असून बँक निफ्टीत ११५.६० अंकाने वाढ झाली. ही वाढ प्रामुख्याने तज्ञांनी दिलेल्या सकारात्मक कौल दिल्याने दिसून येते. कालही सकाळच्या सत्रात सुरुवातीला बँक निर्देशांकात वाढीचे संकेत मिळत होते मात्र अखेरच्या सत्रात घसरण झाली. दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (NIfty Sectoral Indices) मध्ये तुलनात्मकदृष्ट्या मोठी चढउतार दिसून येत नाही. सर्वाधिक वाढ एफएमसीजी (१.०६%), मेटल (०.०८%), खाजगी बँक (०.५६%), फार्मा (०.९१%), हेल्थकेअर (०.५९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७७%) वाढ झाली. सत्राच्या सुरुवातीला सर्वाधिक घसरण मिडिया (१.७६%), ऑटो (०.४८%), आयटी (१.७६%), तेल व गॅस (०.२७%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.४२%), समभागात झाली आहे.

काल आशिया बाजारातील संमिश्र प्रतिसाद असला तरी सकाळी ९.३० पर्यंत आज गिफ्ट निफ्टी (०.२६%), निकेयी (०.१४%) वगळता सुरूवातीच्या कलात स्ट्रेट टाईम्स (०.४६%), हेंडसेंग (१.८२%), तैवान वेटेड (०.१३%), कोसपी (०.११%), सेट कंपोझिट (१.०४%) बाजारात झाली आहे.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ ग्लेनमार्क फार्मा (१०%), जेपी पॉवर वेंचर (६.३४%), आनंद राठी (४.८४%), एसइएमई सोलार (४.७७%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (४.०७%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.९९%), सारडा एनर्जी (३.५१%), जिलेट इंडिया (३.३४%),होंडाई मोटर्स (२.२६%), एनएमडीसी (२.२१%), अजंता फार्मा (१.३६%), अदानी ग्रीन एनर्जी (१.३४%), इंटरग्लोब एव्हिएशन (१.०४%), डाबर इंडिया (०.८८%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (०.८१%), टाटा कंज्युमर प्रोडक्ट (०.७४%), इंडसइंड बँक (०.७२%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.६०%), एलआयसी (०.५०%) समभागात झाली आहे.

सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण इंडियन रिन्यूऐबल (४.३६%), झी एंटरटेनमेंट (४.३%), टाटा इलेक्सी (३.९७%), झेन टेक्नॉलॉजी (२.८४%), अंबर एंटरप्राईजेस (२.८४%), इन्फो ऐज (२.६१%), टीसीएस (२.१५%), अपोलो टायर्स (१. ९१%), लेमन ट्री हॉटेल (१.०२%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.६४%), स्विगी (१.०८%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.९५%), चोलामंडलम फायनान्स (०.९१%), भारती एअरटेल (०.८१%), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (०.२३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.६४%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.७९%) समभागात घसरण झाली.

बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले,'आठवड्यातून वरच्या प्रयत्नांना दबावाचा सामना करावा लागला असल्याने, प्रतीक्षेत असलेला रेंज विस्तार काल २५४४० च्या खाली घसरला होता, तो खालच्या बाजूने उघड होत असल्याचे दिसून येते. आमच्या वरच्या आशा आता २५२२० क्षेत्रांपुरत्या मर्यादित राहून फ्लॅग पॅटर्न तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती तीव्र वाढ होईल. अन्यथा, २५०२५- २४९२० अशी अपेक्षा आहे.'

सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,' २०२५ च्या पहिल्या सहामाहीत बाजार कामगिरीतील एक महत्त्वाचा कल म्हणजे मोठ्या बाजारपेठेच्या तुलनेत मोठ्या कॅप कंपन्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांक आणि निफ्टी मिडकॅप १५० निर्देशांकाने अनुक्रमे ०.३% आणि ४.०% परतावा दिला, तर निफ्टी ५० ने ७.९% परतावा दिला. व्यापक बाजारपेठेचे अतिमूल्यांकन सुधारत आहे. भारत दक्षिण कोरिया, जर्मनी, जपान आणि एमएससीआय ईएम सारख्या बाजारपेठांपेक्षा कमी कामगिरी करत आहे. हे मुख्यत्वे भारतातील वाढलेल्या मूल्यांकनांमुळे आहे. टीसीएसचे पहिल्या तिमाहीचे निकाल आयटी कंपन्यांसाठी, विशेषतः मोठ्या कॅप आयटी कंपन्यांसाठी सतत संघर्ष दर्शवतात. तथापि, मिडकॅप आयटी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीत दूरसंचार, तेल आणि वायू आणि ऑटो सेगमेंटमधून चांगली काम गिरी होईल. गुंतवणूकदार कमाईची दृश्यमानता असलेल्या बऱ्यापैकी मूल्यवान स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात.'

सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) केवळ ०.०६% वाढल्याने बाजारात 'सपाट' (Flat) संकेत अधिक मिळत आहेत. ही अस्थिरता निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातही दिसून आली नव्हती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील वक्तव्याची गुंतवणूक वाट पाहत असतानाच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
Comments
Add Comment

आजपासून Knowledge REIT व Highway Infrastructure आयपीओ बाजारात पहिल्या दिवशी 'असा' प्रतिसाद !

मोहित सोमण: आजपासून नॉलेज रिअल्टी ट्रस्ट आरईआयटी (Knowledge Realty Trust REIT) व हायवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी (Highway Infrastructure Company) या दोन

भारतासाठी खळबळजनक ! डोनाल्ड ट्रम्प यांची धमकीनंतर युएस बाजारही कोसळले उद्याच्या आरबीआयच्या निर्णयावर होणार परिणाम?

मोहित सोमण: आरबीआयच्या पतधोरण निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच पूर्वसंध्येलाच डोनाल्ड ट्रम्प यांनी

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो