सिंदूर पुलाचे आज लोकार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर (पूर्वीचे कनांक) रेल्वे उड्डाणपुलावे लोकार्पण आज सकाळी १० वाजता होणार आहे. हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशीष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार आजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे.

 

 
Comments
Add Comment

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड