पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य!
पुणे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड शैलीत, पण यावेळी नाव न घेता पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान बोलताना पडळकरांनी एका 'कॉकटेल कुटुंबा'चा उल्लेख करत, अप्रत्यक्षपणे पवारांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सांगलीतील 'ऋतुजा पाटील' प्रकरणावरून टीकास्त्र
सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, "हिंदू प्रथा-परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणं ही फसवणूक आहे. अशा पाद्रींना मारायला हवं. सांगलीतील विवाहितेची ही आत्महत्या नसून, कुटुंबियांनी केलेली हत्या आहे."
मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मुंबई बाहेरचे आमदार आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात मंगळवारी ...
पडळकर यांनी पुढे आरोप केला की, "हे कुटुंब त्या मुलीला ती हिंदू परंपरा पाळत असल्याने, तिच्या व्रतांच्या आणि उपवासांच्या दिवशी मुद्दाम घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायचे होते, पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडले."
"ते कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे!"
या प्रकरणात आपण आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, एका समाजाने आंदोलन केलं. त्यात एका गटातील एक कुटुंब पुढे होतं, असं पडळकर म्हणाले. "ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटण खातं. मटण खाऊन दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते 'कॉकटेल' घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत," असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.
पडळकरांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या 'कॉकटेल कुटुंबा'चा संबंध थेट कोणत्या कुटुंबाशी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.