वरळी सी-लिंकवर स्टंट केल्याप्रकरणी गायक यासेर देसाई विरोधात गुन्हा दाखल

  33

मुंबई: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि गीतकार यासेर देसाई याने मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकवर स्टंट करत शूट केलेल्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे.  मंगळवारी (दि.८) संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यासर देसाई आपल्या गाडीतून उतरताना, सी लिंकच्या रेलिंगवर चढताना दिसतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला,  त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. मुळात सी लिंकवर स्टंट्स करण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कृती सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत आणि यामध्ये गुन्हा झालेला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सी लिंक देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यासेर देसाई आणि त्याचा सहकारी, ज्याने व्हिडिओ शूट केला होता, यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. बांद्रा पोलिसांनी यासेरविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८५, २८१, आणि १२५ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी कारवाई करत आहेत.

पोलिस अधिकारी म्हटले की, “आम्ही गाडीच्या नोंदणी तपशीलांवरून देसाईचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा त्याचा शोध लागला की, त्याचे जबाब नोंदवले जाईल आणि त्याला कायदेशीर नोटीस बजावली जाईल.”हा प्रकार हा केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, लोकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.गायक यासेर देसाईने हिंदी सिनेसृष्टीत अनेक गाणी गायली आहेत. २०१६ साली आलेल्या 'बेईमान लव' सिनेमातील गाण्यातून त्याने करिअरला सुरुवात केली. 'ड्राईव्ह'मधलं 'मखना','शादी मे जरुर आना' सिनेमातलं 'जोगी', आणि 'पल्लो लटके', 'गोल्ड' मधलं 'नैनो ने बांधी ऐसी डोर' ही गाणी गायली आहेत.

Comments
Add Comment

अभिनेत्री समृद्धी केळकरची ४० फूट खोल विहिरीत धाडसी उडी !

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केल धाडस मुंबई: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या

प्रिया बापट आणि उमेश कामत सांगणार 'बिन लग्नाची गोष्ट'

१२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी

Kareena Kapoor Khan: तैमूर, जेहनंतर पुन्हा पटौदींच्या घरात पाळणा हलणार? करीनाच्या व्हेकेशन फोटोंमुळे चर्चांना उधाण

मुंबई : बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

"बेघर होऊ देणार नाही! : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना ग्वाही

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले

'दशावतार' चित्रपटाचा फर्स्ट लूक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला; अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. आगामी मराठी चित्रपट 'दशावतार' चा फर्स्ट

Neena Gupta Post: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ताने शेअर केली कोल्हापुरी चप्पल विषयी पोस्ट, लक्ष्मीकांत बेर्डेंचा केला उल्लेख

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली होती निना यांना कोल्हापुरी चप्पल भेट मुंबई: प्राडा विरुद्ध कोल्हापुरी (Prada vs Kolhapuri)