IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र दुसऱ्या कसोटीत गिलच्या संघाने दाखवून दिलं की हम भी कुछ कम नही...एजबेस्टनमध्ये गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं ऐतिहासिक असा विजय मिळवलाय.


भारताचा स्टार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत तब्बल ३३६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावा हव्या होत्या. मात्र इंग्लंडला केवळ दुसऱ्या डावात २७१ धावाच करता आल्या. या ऐतिहासिक विजयासह भारतानं या मालिकेत १-१ अशी बरोबरी गाठलीये.


खरंतर या सामन्यात गिलची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. या एकट्या पठ्ठ्यानं संपूर्ण कसोटीत चारशेपेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या डावात त्यानं अडीचशेहून अधिक धावा केल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावातही तो चमकला. दुसऱ्या डावात त्यानं १६१ धावा केल्या. त्यामुळे भारताची जी एकूण धावसंख्या झाली त्यातील अर्धी धावसंख्या तर एकट्या गिलनंच केली होती. गिलचं नेतृत्वही या सामन्यात कौतुकास्पद होतं.


लीड्सच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर सगळीकडून टीका झाली होती. मात्र ही टीका गिलने पॉझिटिव्हली घेतली आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा जोर दाखवून दिला. गिलची फलंदाजी या कसोटीत चमकली मात्र भारताच्या गोलंदाजीतही दोन हिरे चमकेल.


विशेष म्हणजे या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय उतरला होता. मात्र त्याची कमतरता आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी पूर्ण केले. या दोघांनी प्रत्येकी अर्धा डझनहून अधिक विकेट घेत इंग्रजांच्या संघाला खिंडार पाडण्याचं काम केलं. सिराजनं पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या तर आकाशदीपनं दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. याआधी आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट मिळवल्या होत्या.


लीड्सच्या कसोटीत ज्या ज्या चुका टीम इंडियानं केल्या त्यात या सामन्यात सुधारणा झालेली दिसली. लीड्सच्या कसोटीत भारताच्या खेळाडूंनी ८ कॅच सोडले होते. त्याच्या तुलनेने एजबेस्टन कसोटीत भारतीय संघानं चांगली फिल्डिंग केली. काही ठिकाणी त्यांनी संधी गमावल्या मात्र या कसोटीत त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचा सकारात्मक परिणामही पाहायला मिळाला.


आता तुम्ही म्हणाल की या कसोटी विजयाचे विशेष कौतुक ते कशाला...तर तब्बल ५८ वर्षांनी भारतानं बर्मिंगहॅममध्ये विजयाचा दुष्काळ संपवला. भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता.


आता भारताला तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळायचा आहे. १० जुलैपासून या सामन्याला सुरूवात होतेय. सलग दुसरा सामना जिंकत टीम इंडिया या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघही पराभवातून शिकत जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. गिलच्या नेतृत्वातील यंग टीम इंडियाला पुढच्या कसोटीसाठी खूप खूप शुभेच्छा...



Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला