आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

  39

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन


मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर येणार असून त्याची जबाबदारी येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच निर्भय असून त्यात भावी अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असेल. आपल्या अंगभूत गुणांनी तसेच अभ्यासपूर्ण कृतीतूनच हे ध्येय आपल्याला साध्य करता येईल, असा मूलमंत्र माजी मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.


युवा उत्थान फाऊंडेशनच्या वतीने सुशासनाचे प्रशासक या यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वप्रथम नारायण राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर काही मोजक्या गुणवंतांनी आपल्या खडतर प्रवासाचे अनुभव सांगितले. युवा उत्थान फाऊंडेशन व नरेडकोचे पदाधिकारी अमोल गवळी, प्रशांत शर्मा, अनिता गवळी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम २०१६ पासून आयोजित केला जातो.


नारायण राणे पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून त्यासाठी आपल्या देशाचा जीडीपी कशाप्रकारे वाढवता येईल त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी संविधान, कायदे यांचा अभ्यास करून आपल्या देशाचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे जनतेलाही त्याचा फायदा पोहोचून आपल्या देशाचे नाव उंचावण्यास त्यामुळे मदत होईल व त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, चौफेर नजर आपण आत्मसात करावी. आपले व आपल्या देशाचे नाव मोठे करावे. एक अधिकारीपद म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी नको तर समाजासाठी काहीतरी ते करणारे असावे. तसेच कोणतेही काम भावनेच्या भरात करू नये तर संविधान व कायद्याच्या कसोटीत राहूनच सर्व करावे, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.


आजच ठरवा की जे निर्णय घ्याल ते १४० कोटी जनतेच्या उत्कर्षासाठी असतील. अधिकारी बनला की चाल बदलते, ती बदलू नका. तुमच्यातली माणुसकी कायम ठेवा. पदाचा दुरुपयोग करू नका. पदाचा मान वाढवा, त्यामुळेच तुमचाही मान वाढेल असेही त्यांनी नमूद केले. नैतिकता स्वीकारावी. भविष्यात देश घडेल, त्यात तुमचे मोठे योगदान असेल असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी व्यासपीठावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सुरक्षा व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र उपनवर, यू.पी.एस.सीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अगरवाल, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त रवींद्र शिसवे, सिप्झ विकासाचे सहआयुक्त मयूर मानकर, राजेश दोषी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत