भारताच्या यशस्वी 'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तानने जबरदस्त धसका घेतला आहे. या ऑपरेशनने भारताची स्ट्राइक क्षमता आणि त्याची तयारी संपूर्ण जगाला दाखवून दिली. यामुळे आपले हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी पाकिस्तान मित्र देशाकडून सहकार्य मागत सुटला आहे. ज्यामध्ये चीनचा देखील समावेश आहे.
चीनकडून लष्करी सहकार्याची मागणी
पाकिस्तान आता आपले हवाई दल मजबूत करण्यासाठी चीनकडून मदत घेऊ पाहत आहे. त्याने चीनकडून आधुनिक रडार सिस्टीम केजे-५०० खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याद्वारे भारताकडे नजर ठेवणे त्यानं शक्य होईल.
केजे-५०० म्हणजे काय?
केजे-५०० ही एक एईडब्ल्यू अँड सी म्हणजेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे, जी हवाई देखरेख आणि नियंत्रणासाठी वापरली जाते. ती शत्रूच्या हालचाली आगाऊ शोधू शकते. ४७० किमी पर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता केजे-५०० हे सुमारे ४७० किमी पर्यंत शत्रूच्या लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. यामुळे पाकिस्तानला आकाशावर चांगले नियंत्रण मिळेल. एकाच वेळी ६० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची शक्ती ही रडार प्रणाली एकाच वेळी ६० हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि रिअल टाइममध्ये लढाऊ विमानांना कमांड देऊ शकते.
चीन आधीपासून या रडारचा वापर करत आहे
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) आधीच या रडार प्रणालीचा वापर करत आहे, विशेषतः तैवान आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात याचा वापर केला जात आहे.
भारतासाठी ही चिंतेची बाब का आहे?
केजे-५०० पाकिस्तानला हवाई क्षेत्रात आघाडी देऊ शकते, ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण अधिक सतर्क राहावे लागेल. त्याची तैनाती संवेदनशील असेल, विशेषतः सीमावर्ती भागात. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनही असहाय्य आहे. अर केजे-५०० ची किंमत लाखो डॉलर्सची आहे.
पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि कर्जाचा वाढत चाललेला बोजवारा असूनही, पाकड्या आपल्या संरक्षण सौद्यांवर मोठा खर्च करत आहे.