हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५) या विद्यार्थ्याचा घरी व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण दररोजप्रमाणे घरी व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. प्रवीण खाली पडल्याचा आवाज ऐकून त्याच्या कुटुंबीयांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने प्रवीणला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


प्रवीणच्या अकाली निधनाने धायगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चांदवड पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आणखी एकाचा जीव गेला


काही दिवसांपूर्वी अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, जिथे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. पंकज शर्मा (वय ३७) नावाचा हा तरुण जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी जिममध्ये गेल्यावर पंकजने ब्लॅक कॉफी प्यायली आणि त्यानंतर खांद्यावर पुल-अप व्यायाम सुरू केला. तिसऱ्यांदा पुल-अप करण्याचा प्रयत्न करत असतानाच तो कोसळला. जिममधील इतरांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवता आले नाही.


व्यायाम करताना तरुण व्यक्तींना येत असलेले हृदयविकाराचे झटके ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. या घटनांमुळे व्यायाम करताना योग्य काळजी घेण्याचे आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'