College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थ्यांमध्ये कोयत्यांनी आणि हातोड्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात आझम कॅम्पसमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हा राडा झाला. या घटनेनमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन विद्यार्थी गंभीर जखमी


मिळालेल्या माहितीनुसार, आझम कॅम्पस परिसरातील कॉलेजमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाला. हातात कोयते आणि हातोडे घेऊन काही तरुणांनी कॉलेजच्या आवारातच प्रवेश करून दोन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कॉलेजच्या वेळेतच घडल्यामुळे उपस्थित विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिस तपास सुरू


हल्लेखोर विद्यार्थी की बाहेरचे होते, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. हल्ल्यासाठी वापरलेले कोयते आणि हातोडे कॅम्पस मध्ये कसे आले? हाच मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. CCTV फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीमागे वैयक्तिक वाद की गँग संबंधित कारण आहे हे शोधले जात आहे.
Comments
Add Comment

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या