शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव
विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार करतांना पांडुरंग मेरे रा. हातणे या नागरिकांला पाण्याचा अंदाज न आल्याने व पुलावर गेल्यावर अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने. हा नागरिक पुराच्या पाण्यात पुलावर अडकला होता. प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
पांडुरंग मेरे, रा. हातणे हा आज सकाळी ९.३० च्या सुमारास देहर्जे गावातून शीळकडे जात असताना देहरजे नदीवरील पूल पार करताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याच्या पातळी वाढल्याने पुलाच्या मधोमध अडकला होता. या बाबतची माहिती मिळताच विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण व प्रशासन, शीळ, देहर्जे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तत्काळ दोराच्या सहाय्याने या नागरिकांला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
सुदैवाने या नागरिकांला कोणतेही गंभीर दुःखापत झाली नसून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यासाठी शीळ व देहर्जे गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूर परिस्थिती नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.