Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी मोहीम सुरू


जम्मू:  जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आज, शनिवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा नष्ट केला. पोलिस आणि सैन्याने संयुक्तपणे सुरणकोटच्या जंगलात राबवलेल्या मोहिमेत हा अड्डा आढळून आला.

यासंदर्भातील माहितीनुसार सुरक्षा दलांनी जंगलातील या अड्ड्यातून ३ हातबॉम्ब, एके रायफलच्या १४ गोळ्या, पिस्तूलच्या ६ गोळ्या, वायर कटिंग टूल, एक चाकू, डेटा केबल कनेक्टर, ५ पेन्सिल सेल, एक लोखंडी रॉड आणि एक पेंट बॉक्स जप्त करण्यात आला. या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.



शोध मोहीम अजूनही सुरू


त्याच वेळी, किश्तवार जिल्ह्यातील चतरू जंगलात दहशतवादाविरुद्धची कारवाई चौथ्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या कारवाईत, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी सामना केला आणि अनेक तास गोळीबार सुरू राहिला. अंधार, घनदाट जंगल आणि कठीण भूभागामुळे दहशतवादी पळून गेले. त्यांच्या शोधासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या