"मी मराठी बोलणार नाही..." व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनी फटकारले

मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मराठीच्या मुद्द्यावरुन चाललेले राजकारण आताही सुरूच आहे . अशातच शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत,  थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उबाठा  आणि मनसेने आज मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे माय मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारवाडी जैन समाजातील एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असला तरी. परंतु हे प्रकरण गंभीर होत चालले आहे आणि आता ते एक मोठे राजकीय प्रकरण बनले आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठीत न बोलण्याची शपथ घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी मराठी बोलणार नाही आणि मराठी शिकणार नाही." त्यांच्या या ट्विटमुळे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ज्याचा मुद्दा आजच्या उबाठा आणि मनसे प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित केलं जाऊ शकतो.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


ठाकरे बंधुच्या  विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, त्यांनी जरूर मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते", अशी टीका फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कधीच आदर करणार नाहीत", नितेश राणे यांची काँग्रेसवर टिका

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले मुंबई: कर्नाटक मेट्रो

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश

लग्नाच्या मुद्यावरुन लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना सुनावलं

बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी

Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या