जितेंद्र आव्हाडांचे शिवरायांविषयीचे विधान जाणीवपूर्वक - मंत्री शंभूराज देसाई

- जितेंद्र आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत केलेले विधान हे अनावधानाने आलेले नसून, ते पूर्णपणे जाणीवपूर्वक केलेले आहे. या निंदनीय कृत्यासाठी त्यांना कठोर किंमत मोजावी लागेल, असा इशारा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.


धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आव्हाडांनी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास करत शिवरायांचा अपमान केला. यावर भाष्य करताना देसाई म्हणाले की, "मी स्वतः सभागृहात उपस्थित होतो. आव्हाडांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते दिलगीर असल्याचे कोठेही जाणवत नव्हते. उलट, अध्यक्षांनी तीन वेळा निर्देश देऊनही ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यांना आपल्या वक्तव्याचे कोणतेही गांभीर्य नव्हते."


सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही आव्हाड माफी मागण्यास तयार नव्हते, असे देसाई यांनी सांगितले. "आमची सर्वांची इच्छा त्यांना निलंबित करण्याचीच होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कठोर शब्दांत समज देऊन माफी मागण्याचे निर्देश दिले. अखेर कारवाईच्या भीतीने त्यांनी शब्द मागे घेतले," असेही त्यांनी स्पष्ट केले.



उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा राजकीय नव्हे!


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून होत असलेल्या चर्चेलाही शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला. "संसदेचे अधिवेशन सुरू असताना शिवसेना खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. जिल्हा परिषद निवडीसारख्या स्थानिक प्रश्नांसाठी दिल्लीला जाण्याची त्यांना गरज नाही," असे त्यांनी सांगितले.



महायुतीचा अहवाल तयार :


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आद्यप झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली नाही, त्या ठिकाणांचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू, असेही देसाई यांनी सांगितले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग