Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. ही माहिती सर्पमित्राला मिळताच त्यांच्या अथक प्रयत्नाने अजगराचे प्राण वाचले. मात्र बकरीला यात जीव गमवावा लागला. तालुक्यातील सुरवाडी येथील शेत शिवारात एका १३ फूट अजगराने बकरीला शिकार बनवण्याचा प्रयत्न केला.



सुरवाडी खुर्द शेत शिवारात परिसरातील भूषण भोंबे यांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे आजही चरण्यासाठी गेल्या होत्या. त्याच भागात भला मोठा अजगर दडून बसला होता. अजगराने बकरीवर झडप घालून तिला गिळण्यासाठी विळखा घातला. विळखा मारल्याने अजगराला कमालीचा त्रास होत होता. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती सर्पमित्र अविनाश पांडे यांना दिली. पांडे यांनी अजगराच्या तावडीतून त्या बकरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, बकरीचा यात जीव वाचला नाही. मात्र, अजगराचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी झाले. सर्पमित्र अविनाश पांडे यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या