Violation Of Rights : हक्कभंगातून सुटका नाही! सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर


मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर व्यंगात्मक टिका केली होती. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन केलेले विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता गत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal kamra) आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या कारवाईला जोर आला होता. आता, पावसाळी अधिवेशनात या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे. सुषमा अंधारेंनीही व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे.




कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर


कुणाल कामराने ज्या स्टुडिओत हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचं गाणं म्हंटल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. त्यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार असल्याने कॉमेडियन कामरा आणि शिवसेना नेत्या अंधारेंच्या अडचणी वाढल्या आहेत.


कुणाल कामराने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हा हक्कभंग दाखल करण्यात आला होता. तर, कामराचा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा अंधारेंनी शेअर करत, स्वत: व्हिडिओ बनवून समर्थन केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील हक्कभंग दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाला मंजुरी मिळाली आहे.



काय म्हणाले दरेकर ?


सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,