नुवामा या ब्रोकिंग रिसर्च कंपनीने म्हटल्याप्रमाणे, कंपनीच्या संचालक मंडळाच्या २५% दरवाढीचा महत्वकांक्षी निर्णयानुसार कंपनीची वाढ पुढील काही वर्षांत होईल असे दिसत नाही.' असे म्हटल्यावर गुंतवणूकदारांची निराशा झाली. नुवामा (Nuvama) अंदाजानुसार, कंपनीच्या आर्थिक परिस्थितीत विशेष वाढ होणार नसल्याने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीच्या एकूण महसूल ५ ते ६ % घसरू शकतो. सकाळी साडेनऊ टक्क्याहून अधिक कोसळल्यानंतर सध्या कंपनीचा सम भाग (Share) ८.६२% कोसळला आहे. मागील तिमाहीत ट्रेंटला ३५४ कोटींचा करोत्तर नफा (Profit After Tax PAT) मिळाला होता. ३०३ कोटींच्या अपेक्षेहून अधिक नफा कंपनीने कमावला तरी कंपनीच्या एकत्रित (Consolidated) न फ्यात इयर ऑन इयर बेसिसवर थक्क करणारी ५५% घसरण झाली होती.त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, ट्रेंटने म्हटले होते की,' आर्थिक वर्ष २०२६ च्या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहीत २०% च्या जवळपास वाढ अपेक्षित आहे जी कंपनीने नोंदवलेल्या ३५% च्या पाच वर्षांच्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरापेक्षा (Compound Annual Growth Rate CAGR) खूपच कमी आहे.'
याचा परिणाम म्हणून, ब्रोकरेज फर्म नुवामाने ट्रेंटवरील आर्थिक वर्ष २०२६ आणि २०२७ च्या महसूल वाढीच्या अंदाजात अनुक्रमे ५% आणि ६% आणि व्याज, कर, घसारा आणि अमर्टायझेशन (Amortization) करपूर्व नफाच्या (EBITDA) आधीच्या कमाईच्या अंदाजात ९% आणि १२% कपात नुकतीच केली होती. नुवामाने ट्रेंटला त्याच्या पूर्वीच्या 'खरेदी' (Buy Call) रेटिंगवरून "होल्ड" (Hold) करण्यासाठी देखील कमी केले आहे आणि त्याचे किंमत लक्ष्य (Target Price) ६,६२७ वरून ५,८८४ कोटीपर्यंत कमी केले होते.
इतर काही विश्लेषकांनी, कंपनीची पुढील पाच वर्षांत वाढ २५% ते ३०% CAGR असू शकते असे म्हटले आहे. व्यवस्थापनाने असेही अधोरेखित केले आहे की या क्षेत्रात अनेक खेळाडूंसाठी जागा असल्याने त्यांना स्पर्धेची चिंता नाही. ट्रेंटला कव्हर करणाऱ्या २५ विश्लेषकांपैकी १८ जणांना स्टॉकवर "खरेदी" रेटिंग आहे, चार जणांना "होल्ड" रेटिंग आहे, तर तीन जणांना 'विक्री' (Sale) रेटिंग आहे.
नक्की ट्रेंट कंपनी काय करते?
ट्रेंट लिमिटेड ही भारतातील टाटा समूहाची एक रिटेल उपकंपनी आहे. ती डिपार्टमेंट स्टोअर्स, हायपरमार्केट, सुपरमार्केट आणि स्पेशॅलिटी स्टोअर्ससह विविध रिटेल फॉरमॅट चालवते. प्रमुख ब्रँड्समध्ये वेस्टसाइड, झुडिओ आणि स्टार यांचा समावेश आहे. ट्रेंटचा भारतातील झारा आणि मॅसिमो दुट्टी स्टोअर्ससाठी संयुक्त उपक्रमांमध्येही हिस्सा (Stake) आहे.