पुणे लैंगिक छळ: मोठा खुलासा , तक्रार खोटी!

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार समोर आली होती, ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाच्या पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही प्रकार घडलाच नव्हता आणि ही संपूर्ण घटना तरुणीच्या मानसिक अस्थैर्यामुळे घडली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.


बुधवारी (४ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि परिसरातील नागरिकांची चौकशी केली. सकाळी ९ वाजता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, तरुणीला सीसीटीव्ही क्लिप दाखवण्यात आली, परंतु तिने आरोपीला ओळखण्यास नकार दिला.


तो तरुण तरुणीच्या ओळखीचाच


पोलिसांनी इमारतीतील ४४ फ्लॅटमधील रहिवाशांची चौकशी केली. यात स्पष्ट झाले की, संशयित तरुण कोणताही डिलिव्हरी बॉय नव्हता आणि त्याने कोणत्याही अधिकृत प्रवेशाशिवाय घरात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक केला, ज्यात तो रात्री ३ वाजता बाणेर येथे असल्याचे आढळले. अधिक तपासात, हा आरोपी तरुणीच्या ओळखीचाच असल्याचे स्पष्ट झाले.


सेल्फी संमतीनेच, 'मी पुन्हा येईन' मजकूरही तरुणीनेच लिहिला


या प्रकरणात व्हायरल झालेल्या सेल्फीबद्दलही महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सेल्फी तरुणीच्या संमतीनेच काढले गेले होते आणि त्या फोटोसोबत असलेला "मी पुन्हा येईन" हा मजकूर खुद्द तरुणीनेच लिहिल्याचे तिने प्राथमिक जबाबात मान्य केले. घटनेच्या वेळी आपली मानसिक अवस्था स्थिर नसल्यामुळे आपण चुकीची तक्रार दिली, असे तरुणीने पोलिसांना सांगितले.


५०० अधिकारी तपासात, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा


या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी क्राईम ब्रँचचे २०० अधिकारी आणि स्थानिक पोलीस दलातील ३०० अधिकारी असे एकूण ५०० पोलीस कर्मचारी कार्यरत होते. पुणे पोलीस विभागाने या घटनेबाबत स्पष्ट केले आहे की, ही घटना वास्तव नसून कपोलकल्पित आहे. तसेच, अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या