झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा सध्या राशिचक्रकार शरद उपाध्याय आणि निलेश साबळे यांच्या आरोप प्रत्युत्तरातून सुरू आहे. काल शरद उपाध्याय यांनी नीलेश साबळे यांच्यावर टीका केली. त्यावर उत्तर म्हणून डॉ. नीलेश साबळेने मुद्देसूद पद्धतीने आपली बाजू मांडली . यासाठी नीलेशने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून एक लांबलचक व्हिडिओ पोस्ट केला. या संदर्भात उत्तम भाषाशैलीत ठळक मुद्दे लिहून त्यांच्या प्रत्येक तक्रारीच निरसन केल. तो नक्की व्हिडिओच्या माध्यमातून काय म्हणाला आपण जाणून घेऊया.
राशीचक्रकार शरद उपाध्याय यांना चाल हवा येऊ द्याच्या सेटवर योग्य वागणूक मिळाली नसल्याची पोस्ट त्यांनी केली होती. शिवाय नीलेश साबळेने त्यांची विचारपूस देखील केली नाही असे देखील त्यात ते म्हणाले. या पोस्ट मध्ये त्यांनी डोक्यात हवा गेली आहे, हकालपट्टी केली असे शब्द वापरले जे नीलेश साबळेला रुचले नाहीत. ते वाचून नीलेश साबळेने अतिशय आदरपूर्वक भाषेत प्रत्येक वाक्याला अनुसरून त्याची उत्तर दिली.व्हिडिओच्या दोन भागाद्वारे त्याने उपाध्याय यांच्या प्रत्येक वाक्यावर आपले मत मांडले.
निलेश साबळेने कार्यक्रमातील सेटवरील सोयीसुविधा, शरद उपाध्याय यांसोबतचे संभाषण हे सर्व काही स्पष्ट केलं. यावर प्रतिक्रिया देताना अनेक प्रेक्षकांनी निलेश साबळे यांचं कौतुक केलं. 'किती नम्रपणे पण स्पष्टपणे आणि थेट..,' 'तू व्यक्त होणं फार गरजेचं होतं निलेश' अशा शब्दात अनेक कलाकारांनी आणि नीलेश साबळेच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या.