राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

  43

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केला, त्यांना खळखळून हसवलं, कधी यामधील भावून पत्रांनी डोळ्यात पाणी आणलं आणि अनेक सिनेमे, मालिका, नाटक यांची कार्यक्रमातून प्रसिद्धी देखील केली. या मालिकेची धुरा निलेश साबळे सांभाळत होते. भाऊ कदम, श्रेया बुगडे,भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांसारख्या उत्तम कलाकारांचं सादरीकरण आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाल. परंतु या कार्यक्रमाचा टीआरपी घसरल्याने हा कार्यक्रम अचानक बंद करावा लागला.परंतु आता अश्यातच आता 'चला हवा येऊ द्या' च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. या पर्वाच सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. आता दुसऱ्या पर्वात निलेश साबळे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.यावर राशिचक्रकार शरद उपाध्याय यांनी पत्र लिहीत 'चला हवा येऊ द्या' मध्ये मिळालेल्या वागणुकीविषयी आणि निलेश साबळेंविषयी भाष्य केलं आहे.
राशीचक्राकार शरद उपाध्याय म्हणतात की, आदरणीय निलेशजी साबळे,'आपल्याला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो.पण 3 वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते. पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात. पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता, स्माईलही न देता स्टेजवर गेलात.इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटिंगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले.
पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्यांबद्दल आदर ठेवायचा असतो. पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ठ माणसाचे अध:पतन होते.एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो.स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. निलेशजी, स्वभाव मनमिळाऊ असावा. साऱ्यांना सांभाळून घ्यावे. मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.
अशा शब्दात शरद उपाध्याय यांनी निलेश साबळे यांना खडेबोल सुनावत त्यांची सौम्य शब्दात कानऊघडणी केली आहे. यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत सहमती दर्शवली आहे.
Comments
Add Comment

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

प्राजक्ता माळीचा आहे पंढरपूरशी खासगी संबंध...

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या खाजगी आयुष्यात देखील तितकीच ऍक्टिव्ह असते.अनेक वेळा ती

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’चा अंतिम सोहळा...

सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांनसमोर सातत्याने आणले

रविंद्र नाट्य मंदिर मध्ये 'एक तिची गोष्ट' नाटकाचा पहिल्या प्रयोगच शानदार सादरीकरण ...

'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य,

थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून आदेश बांदेकर यांनी केली सेवा; हृषिकेश आणि सारंगही होते सोबत

मुंबई: अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून