'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान


मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.





"उद्धव ठाकरेंनीच निवडणुका थांबवल्या, आता घाबरत आहेत!"


आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासक नेमला. नवीन जनगणना नसतानाही त्यांनी २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करत २३६ वॉर्डांची रचना केली. यात घोळ घालून निवडणुका लांबवल्या. २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणुका रोखून धरल्या."


शेलार पुढे म्हणाले, "आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. तरीही दोन निवडणुका लढल्यानंतर पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यातून पुन्हा निवडणुका लांबवण्याचाच डाव दिसतोय. निवडणुकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा हा कारभार आहे," असं म्हणत शेलारांनी उबाठाला टोला लगावला.



"मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष!"


मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचंही शेलार यांनी अधोरेखित केलं. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटलं, "हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या!"


सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी, वॉर्ड रचनेपासून ते चिन्ह आणि पक्ष प्रकरण याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी केली असली तरी, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा अडथळे येण्याची शक्यता कायम आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती