कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर बसतानाच उबाठाने चार वेळा नगरसेविका बनलेल्या आणि महापौर पद भूषवलेल्या किशोरी पेडणेकर यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली. परंतु महापौर पद भूषवलेल्या किशोरी पेडणेकर या मात्र सभा शास्त्रात नापास ठरल्याचे दिसून येवू लागले आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्याला निवेदन करण्याचा अधिकार आहे. मात्र, या निवेदनाची प्रत न देता तोंडीच निवेदन मांडण्याच्या प्रयत्नात किशोरी पेडणेकर यांचे सभा शास्त्राचे अज्ञानपण उघड झाले आणि भर सभागृहात चिडीचूप खाली बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे उबाठाची मोठी नाचक्की यामुळे सभागृहात झालेली पहायला मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या या महिन्याच्या पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांकडे निवेदन करण्याची परवानगी मागितली. निवेदन करण्याचा विरोधी पक्षाचा अधिकार असल्यामुळे महापौरांनी त्यांना परवानगी दिली. मात्र, ज्या विषयावर ते निवेदन करणार होते, त्याची कोणतीही प्रत महापौरांसह उपस्थित सदस्यांना त्यांनी दिली नाही. आजवरच्या प्रथा आणि परंपरेनुसार, विरोधी पक्षनेत्यांना ज्या विषयावर निवेदन करायचे असते, त्या निवेदनाच्या प्रती सभागृहात वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौरांनी, त्यांच्याकडे लेखी निवेदनाची मागणी केली. परंतु त्यांनी लेखी निवेदन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सभागृहनेते गणेश खणकर यांनी त्यांना हरकत घेतली. परंतु त्यानंतरही त्या आपल्या मतांवर ठाम राहिल्या. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे उभे राहिले आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन करण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या विषयावर निवेदन केले जाणार आहे, त्या निवेदनाची प्रत त्यांनी सभागृहातील सर्व सदस्यांना देणे आवश्यक आहे. आणि हीच मागणी आमची आहे. पण अशाप्रकारे तोंडी निवेदन केले जात नाही. त्यामुळे ते स्वीकारता येत नाही,असे सांगितले. त्यामुळे यावर गोंधळ घालून काहीही उपयोग नाही. असा कारभार अपेक्षित नाही. आपल्याकडे चार माजी महापौर आहेत, दोन उपमहापोर आहेत. त्यांनी सांगावे अशाप्रकारचे तोंडी निवेदन विरोधी पक्षाला आपण कधी करू दिले होते का? त्यामुळे निवेदनाची प्रत सर्व सदस्यांना द्यावी आणि आपले म्हणणे मांडावे.


मात्र, निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेत्यांनी द्यायला नकार दिल्यामुळे अखेर महापौर रितू तावडे यांनी सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन करण्याचा अधिकार आहे, हे नाकारता येत नाही. पण निवेदनाची प्रत सभागृहाती सदस्यांना न देता आपण मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही असे सांगत विरोधी पक्षनेत्यांना निवेदन मांडण्यापासून परावृत्त केले. एवढेच नाही नाही विरोधी पक्षनेत्या ज्या मुद्यावर निवेदन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मुद्दयावर ६६ ब अन्वये नगरसेविकेने मांडलेल्या मुद्दयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे आपण निवेदन करताना किमान कोणत्या मुद्दयावर निवेदन करतो याची तरी माहिती घ्यावी,असे बोल महापौरांनी सुनावले. मात्र, महापौर एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह त्यांच्या नगरसेवकांना या सभागृहात शिस्त पाळलीच गेली पाहिजे. या सभागृहात या बाईंची शिस्त चालते. त्यामुळे आपण बसला कि माईक बंद होईल अणि उठलात तरच माईक चालू होईल अशीही कोपरखळी मारत त्यांना आपल्याला अजुन खूप सभाशास्त्र शिकायचे आहे,असाच संदेश दिला.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता