कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन 


पुणे: कोंढवा येथील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, दि. २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका गेटेड सोसायटीमध्ये एका व्यक्तीने स्वतःला कुरिअर बॉय म्हणून दर्शवत प्रवेश मिळवला आणि पीडितेच्या घरी जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर धमकीवजा मेसेज ठेवून निर्ढावलेपणा दाखवला.

विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश 


डॉ. गोऱ्हे यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत करून घटनेचा सखोल तपास केला जावा, असे त्यांनी सुचवले आहे.

तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी, अशी त्यांनी सूचना केली आहे.

या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षाव्यवस्थेची त्रुटी स्पष्टपणे समोर आली असल्याने डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षक, रजिस्टर नोंदी व प्रवेश नियंत्रण यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे


पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी सर्व गेटेड सोसायट्यांमध्ये प्रवेश नोंदणी सक्तीची करणे, बायोमेट्रिक किंवा डिजिटल लॉग प्रणाली अनिवार्य करणे आणि महिला सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सोसायटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

तसेच, पोलीस प्रशासनाने “सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे” तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे.

ही घटना केवळ एका महिलेवर झालेला अत्याचार न राहता संपूर्ण शहरातील महिलांच्या सुरक्षेला गालबोट लावणारी आहे. म्हणूनच, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा बसावा यासाठी तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली असून पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.यासोबतच नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे तसेच सर्वच कुरियरवाल्यांना एकाच तराजूत न तोलण्याचे आवाहन करत महिला सुरक्षेसाठी पुरुषी मानसिकतेमध्ये बदलाबाबत देखिल त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.
Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना