ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

  67

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला जाणार 


केरळ: प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले एफ-३५बी हे बंद पडलेलं लढाऊ विमान गेली कित्येक दिवस भारतात पडून आहे.  केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर हे विमान कार्यरत असताना, खराब हवामान आणि कमी इंधनामुळे त्याला भारतातील तिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले होते. तेव्हापासून हे विमान जागचे काही हललेच नाही. विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले असून, आता हे विमान तुकड्यांमध्ये ब्रिटनला परत नेले जाईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते अमेरिकन बनावटीचे अत्यंत महागडे विमान होते, जे पुन्हा दुरुस्त न झाल्याने त्याचे तुकडे करून पाठवले जाणार आहेत! 

अमेरिकन बनावटीचे ब्रिटनने खरेदी केलेले हे विमान अत्यंत महाग असल्याचं म्हंटलं जातं. सध्या हे विमान, सीआयएसएफ सुरक्षेखाली  तिरुवनंतपुरम विमानतळाच्या बे-४ मध्ये उभे करण्यात आले आहे. सुरुवातीला, केरळमध्ये पावसाळा असूनही, रॉयल नेव्हीने एअर इंडियाचा जेट हँगरमध्ये हलवण्याचा प्रस्ताव नाकारला होता. नंतर, ब्रिटिश नौदलाने जेट हँगरमध्ये हलवण्यास सहमती दर्शविली.

१९ दिवसानंतरही विमानाची दुरुस्ती झाली नाही


ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५ लढाऊ विमानाने १४ जून रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानळावर आपत्कालीन लँडिंग केले. मात्र १९ दिवसांनंतरही या विमानातील बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव लष्करी मालवाहू विमानाद्वारे हे लढाऊ विमान तुकड्यांमध्ये ब्रिटनला परत नेले जाणार आहे. 

भारतीय हवाई दलाने केली सर्वतोपरी मदत


भारतीय हवाई दलाने या विमानाच्या सुरक्षित लँडिंगमध्ये सर्वतोपरी मदत केली. त्यात इंधन भरले आणि रसद देखील पुरवली. मात्र, जेव्हा हे लढाऊ विमान त्याच्या विमानवाहू जहाजात परत जाण्याच्या तयारीत होते, तेव्हा प्री-टेक ऑफ तपासणी दरम्यान हायड्रॉलिक बिघाड आढळून आला. ही समस्या गंभीर मानली जात आहे.  कारण त्यामुळे जेटच्या सुरक्षितपणे उड्डाण आणि उतरण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तीन तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या रॉयल नेव्हीच्या एका लहान टीमने बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु समस्येच्या गुंतागुंतीमुळे ते अयशस्वी झाले.

आता जेट तुकड्यांमध्ये परत जाणार


केरळमध्ये विमान दुरुस्त करण्याचे अनेक प्रयत्न करूनही, अभियांत्रिकी दोषांमुळे पाचव्या पिढीचे स्टील्थ जेट अजूनही बंद अवस्थेतच आहे. विमानाला पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरले असल्याची पुष्टी सूत्रांनी केली आहे. अशा परिस्थितीत विमान पुन्हा इंग्लंडला घेऊन जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. तसेच हे विमान परत घेऊन जाण्याची कोणतीही अंतिम मुदत नसल्यामुळे, ब्रिटिश अधिकारी आता विमान परत आणण्यासाठी पर्यायी योजनांवर काम करत आहेत. लष्करी वाहतुकीच्या वतीने विमान परत नेण्यासाठी विमानाचे अंशतः विघटन केले जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. 

 
Comments
Add Comment

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी