रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

  85

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून त्यातून बोध घेतले जातात. परंतु अश्या लोकमानसात अतिशय आदराने आणि भक्तीने वाचल्या जाणाऱ्या कथा रुपेरी पडद्यावर आणण धाडसाचं काम असतं. यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता असते.अश्या महाकाव्यांशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. 'रामायण: द इंट्रोडक्शन' या सिनेमाच्या माध्यमातून नमिता मल्होत्रा यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपटाचा पहिला लूक मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या शहरांमध्ये उद्या म्हणजे ३ जुलै २०२५ ला सर्वप्रथम दाखवण्यात येणार आहे.

'रामायण: द इंट्रोडक्शन' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन तिवारी यांच्याकडे आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका करणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतामाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे. यामुळे या सिनेमाची व्याप्ती मोठी आहे.

या भव्य सिनेमामध्ये उच्च दर्जाचा CGI-VFX वापर, आणि कलात्मक-तांत्रिक सर्जनशीलतेचा वापर केला गेला आहे. Prime Focus Studios, 8 वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, आणि अभिनेता यश यांच्या Monster Mind Creations यांच्यातील सहकार्यामुळे हा प्रकल्प फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता जगभर या महाकाव्याच दर्शन घडणार आहे.आता उद्या होणाऱ्या 'रामायण: द इंट्रोडक्शन' या सिनेमाच्या पहिल्या लुककडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे .
Comments
Add Comment

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर