Prasad Lad : बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधान परिषदेत आज भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून काहींनी ३.२० कोटी सरकारी निधी लंपास केल्याचा आरोप आहे. अधिवेशन संपल्यानंतर ४.३० वाजता मला रत्नागिरी येथून अधिकाऱ्यांचा फोन आला. आपण मागणी केल्याप्रमाणे ३ कोटी २० लाख निधी बीड जिल्ह्याला वर्ग केला आहे. त्याबाबत तुमचा फोनही आला होता असं सांगण्यात आले. त्यानंतर मला संशय आला आणि ती पत्राची प्रत मागवली. त्यातले लेटरहेड बनावट होते. सही खोटी होती. मी फोनही केला नव्हता असा गंभीर आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला.



४ नावे समोर


सभेत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मी चौकशी केली असता हा निधी कुणीतरी चोरायचा प्रयत्न केला आहे हे लक्षात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घातली. मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. रात्री उशिरा याबाबत सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४ नावे माझ्याकडे आली तीदेखील पोलिसांना कळवली आहेत. याप्रकारे सरकारी निधी हडपण्याचा प्रकार समोर आला. हा निधी मोठा होता म्हणून लक्षात आले. परंतु छोटे छोटे निधी हडप करण्याचे प्रकार याआधीही झाले आहेतअसं त्यांनी सांगितले.



बंडू नावाचा गृहस्थ


तसेच आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्याबाबत हे झाले होते. स्वत: राम शिंदे सभापती होण्यापूर्वी त्यांच्यासोबतही हे घडले होते. अशा टोळ्या राज्यात कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याचे नाव आल्यावर मी सतर्क झालो. आधीच बीडचा बोलबाला झाला आहे. बीडमधले हे महाठग कोण आहेत त्याची पोलीस चौकशी करत आहेत. माझ्याकडे अज्ञात नंबर आलेत ते पोलिसांना दिलेत. बंडू नावाचा गृहस्थ आहे जे सरपंच असल्याचे सांगतात. पोलीस चौकशी करतील. तांत्रिक पद्धतीने आमदार निधी वाटप केले जावे, जेणेकरून आमदारांना त्याचा ओटीपी येईल मग निधी दिला जाईल अशी मागणी मी सभागृहात केल्याचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापतींनी चौकशी करून तात्काळ दोषींना अटक करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.


Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या