Nothing Phone 3: Nothing चा फ्लॅगशिप लाँच 'या' कारणामुळे फोन भारतात फ्लॉप ठरणार? एवढ्या किंमतीत.....

प्रतिनिधी: नथिंग फोन ३ भारतात काल रात्री लाँच झाला होता. बहुप्रतिक्षित आणि संपूर्ण स्मार्टफोन बाजारात 'हाईप' झालेला फोन वास्तवात फ्लॉप ठरणार का ही चर्चा सर्वत्र सुरु आहे. खरं तर नथिंग फोन ३ या स्मार्टफोनकडून खूप आशा होत्या. मात्र सॅमसंग,आयफोनचा रांगेत बसण्याचा प्रयत्न नथिंगला डोईजोड होईल का हा खरा प्रश्न आहे. प्राईजिंग (Pricing)  बाबतीत त्यांनी प्रिमियम दराने विक्रीस काढला असला तरी फिचर्स पाहता ती फिचर्स ३० हजार रुपयांच्या इतर फोनमध्ये असल्यामुळे टेकी नाराज झाले आहेत. प्रामुख्याने काल नथिंग फोन ३ ७९००० रूपयांपासून लाँच झाल्यानंतर बाजारात घोर निराशा झाली. काळा,पांढरा व्हेरिएंटमध्ये कंपनीने लाँच केलेला फोन २५६ जीबी आवृत्तीसाठी ७९००० रूपयांना लाँच झाला असून १६ जीबी,५१२ जीबी आवृत्तीसाठी फोनची किंमत ८९००० रूपये ठेवण्यात आली आहे.

काल फ्लिपकार्टवर या फोन लाँच करण्यात आला होता.काल रात्री १०.३० वाजता फोनच्या लाँचचा कार्यक्रम नथिंग कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पार पडला. तेव्हा कंपनीचे सीईओ कार्ल पी (Carl Pei) यांनी फोनबाबत भाष्य करताना हा फोन ट्रेंडसेटर असल्याचे म्हटले होते. संपूर्ण फिचर्समध्ये पुनर्निर्माण करून हार्डवेअर सोबत सॉफ्टवेअरचा अनुभव विलोभनीय बनवण्यात आला आहे असे पी यांनी म्हटले होते. मात्र भारतीय बाजारातील फिचर्सच्या मानाने अवाच्या सव्वा किंमत आकारणी केल्याने फोन विक्रीबाबत तज्ञांच्या मते घसरण होऊ शकते‌.



मर्यादित काळासाठी, ते अनुक्रमे ६२,९९९ आणि ७२,९९९ रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. ही ऑफर निवडक भागीदार बँकांवर ईएमआय प्लॅनद्वारे मिळू शकते. ही ऑफर फ्लिपकार्ट, विजय सेल्स, क्रोमा आणि निवडक अधिकृत रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे  नथिंग फोन २ (Nothing Phone 2) तुलनेत या फोनची म्हणजे पुन्हा डिझाइन केलेले मागील पॅनेल, ज्यामध्ये असामान्य कॅमेरा प्लेसमेंट, ग्लिफ मॅट्रिक्स (Glif Matric), इसेन्शियल की (Essential Key) यामध्ये बदल झाले आहेत. याशिवाय लीकने सांगितल्याप्रमाणे यावेळी स्नॅपड्रॅगन 8 Elite न देता कंपनीने ८ जेन ४ प्रोसेसर दिला आहे.

फिचर्स (Phone Specifications) -

Nothing Phone 3 सर्व बाजूंनी १.८७ मिमी आकाराचे अल्ट्रा-स्लिम बेझल आहेत. स्मार्टफोनमध्ये ६.६७-इंचाचा अमोल्डेड (AMOLED) डिस्प्ले आहे ज्यामध्ये १२०Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि ४५०० निट्स पीक ब्राइटनेस कंपनीने दिलेला आहे.

नथिंग फोन ३ मध्ये अपग्रेडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे ज्यामध्ये ५०MP OIS मुख्य कॅमेरा, ५०MP OIS पेरिस्कोप कॅमेरा आणि ५०MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. समोर, तो ५०MP सेल्फी कॅमेरासह फोनमध्ये पर्याय आहे.

फोन ३ मध्ये ५५००mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे जी ६५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित नथिंग ओएस ३.५ वर चालेल मात्र याची लवकरच अपडेट मिळू शकते. अँड्रॉइड १६ वर आधारित नथिंग ओएस ४.० ओएसची (Operating System) २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सॉफ्टवेअरमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत ज्यात इसेन्शियल स्पेस, इसेन्शियल सर्च अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. ४ जुलैपासून फोनसाठी प्रीऑर्डर करता येणार आहे.

फोनच्या तुलनेत नुकतेच लाँच झालेले पोको एफ ७, मोटो एज ६० प्रो, रिअलमी जीटी ७, आयक्यूक्यू निओ ७, विवो टी ४ अल्ट्रा असे तुल्यबळ फोन ३० ते ४० हजारांपर्यंत उपलब्ध असल्याने केवळ क्लीन ओएससाठी ४० हजार रूपये अधिक मोजणे कितपत किफायतशीर ठरेल असा प्रश्न नेटिझन्सलाही पडला होता. वनप्लसचे सह-संस्थापक (Co Founder) कार्ल पेई यांनी काहीही स्थापन केले नव्हते, ज्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनी सोडली. टोनी फॅडेल, केविन लिन, स्टीव्ह हफमन आणि केसी नीस्टॅट यांच्यासह गुंतवणूकदारांकडून ७ दशलक्ष डॉलर्स उभारले. जानेवारी २०२१ मध्ये कंपनीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची