Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

  47

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. ढगफुटी आणि पुराने येथे देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. तब्बल ११ ठिकाणी ढगफुटी झाली. नद्या-नाल्यांना अचानक आलेला पूर आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार उडाला. राज्यातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या या घटनांत १० जणांचा मृत्यू झालाय. ३० जण बेपत्ता असून, यात एकाच घरातील ६ जणांचा समावेश आहे. सगळ्यात जास्त कहर मंडी जिल्ह्यात झाला आहे.


हिमाचल प्रदेशात मंगळवारी ११ ठिकाणी ढगफुटी झाली. ४ ठिकाणी अचानक पूर आला, तर एका ठिकाणी भयंकर भूस्खलन झाल्याची घटना घडली. यात सर्वात जास्त फटका मंडी जिल्ह्याला बसला आहे. मंडी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, २४ तासांमध्ये २५३.८ मिमी पाऊस पडला आहे.




कोणत्या ठिकाणी झाली ढगफुटी?


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ जुलै) दिवसभरात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. यातील ७ ठिकाणे मंडी जिल्ह्यातील आहेत. अचानक आलेल्या पुरांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. चुलाथाजमध्ये अचानक पूर आल्याने शेकडो झाडे उन्मळून पडली आणि वाहून गेली. पुराच्या पाण्यात अनेकजण वाहून गेले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील ६ जण बेपत्ता आहेत.



दरम्यान, सोमवारी (३० जून) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही इमारती कोसळल्या असून अनेक भागात भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झालेत. अशातच, पावसाळ्यापासून आतापर्यंत राज्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी सकाळी हिमाचलच्या मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ भूस्खलन झाले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहने बोगद्यातही अडकली आहेत. सतर्कतेमुळे आज हिमाचलच्या ४ जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच