पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील शेळकेंनी उत्खनन क्षेत्रातील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच शेळकेंवर कारवाई करून महाराष्ट्राची लूट थांबवावी अशी मागणी देखिल राऊतांनी या पत्राद्वारे केली आहे. या आरोपांवर आता सुनील शेळकेंनी भाष्य केलं. संजय राऊतांनी यासंबंधीचे पुरावे दिले तर मी त्यावर खुलासा करेन, असं ते म्हणाले. तर आरोप करणं हा राऊतांचा नेहमीचा उद्योग असल्याचं विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले.


आमदार सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या आऱोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,संजय राऊत यांनी माझ्यावर कोणताही पुरावा नसताना आरोप केले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे माहिती असेल, काही पुरावे असतील किंवा मला यासंबंधीच्या शासकीय नोटीसा आल्या असतील, माझी चौकशी चालू असेल तर त्यांचे पुरावे सादर करावेत. जोवर ते पुरावे सादर करणार नाहीत, तोवर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही खुलासा करणार नाही, असं शेळके म्हणाले.



सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्या पक्षांचे आमदार आणि खासदार महाराष्ट्राला लुटत आहेत आणि फडणवीसांचे याकडे लक्ष नाही. आमदार सुनील शेळकेंनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी लुटली आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खाण उद्योग सुरू करून त्यांनी सरकारची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल सविस्तर तपशील पाठवला. त्यासोबत पुरावेही जोडले आहेत, असं राऊत म्हणाले.


ते म्हणाले, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांच्या भ्रष्टाचाराचे २१ खटले पुराव्यांसह पाठवले आहेत. मात्र, फडणवीसांनी आजपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा मी त्यावर कारवाई करेन, असंही सांगितलं नाही.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात