ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यासोबतच भारताने आपले ५ गडी गमावलेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल ११४ आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर खेळत होते.


या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुल २ धावांवर खेळत असताना टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल २ धावा करून बाद झाला. यशस्वी जायसवालने सलामीला साजेशी ८७ धावांची खेळी केली. तर त्याला साथ देणारा करूण नायर ३१ धावा करून बाद झाला.


करूण बाद झाल्यानंतर जायसवाल आणि गिलची जोडी जमली. मात्र जायसवालही ८७ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने त्यानंतर २५ धावा करत गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. पंतनंतर आलेला नितीश कुमार रेड्डी अवघी एक धाव करून बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत.


भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना संघात सामील केले गेले. बुमराह या सामन्यात खेळत नाही आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण