Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे


मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे” असं नारायण राणे म्हणाले. “राज यांनी शिवसेनेत यावं, असं ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. तो नाही बोलवणार” असं नारायण राणे म्हणाले.



मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?


'राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. उद्धव ठाकरेंनी एवढं छळलंय राज ठाकरेंना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. तेच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या स्वागताला तयार आहेत'... “काय भविष्य? भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या २३५. आता यांना मराठी माणूस आठवला. त्यांच्यासाठी काय केलं. आज मराठी टक्का १८ टक्के फक्त. १९६० साली ६० टक्के होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?” असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.



“त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी?: मराठी माणसासाठी, तरुणासाठी, नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. हेच लोक आता मराठी भाषेचा आंनदोत्सव साजरा करतायत. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही” असं नारायण राणे म्हणाले.



"ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे"


“बाळासाहेबांनी ४८ वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकलं. ओरिजनल शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे” असं नारायण राणे म्हणाले. “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं. स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते उदहारण दिलं” असं नारायण राणे म्हणाले.



मातोश्रीचा एक भाग देतोस का?


दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. “दोन भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या. आम्हला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज ३२५ आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जातय तर, मातोश्रीचा एक भाग देतोस का?” असं खोचक सवाल नारायण राणेंनी केला.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब