मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

  53

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका


मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचे ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रही असल्याचा ठराव त्यामध्ये संमत करण्यात आला. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. आपल्यात शिवसैनिक हे पद सर्वात मोठे आहे, हे लक्षात ठेवा. कार्यकर्ता हा नेता तयार करतो, पक्ष घडवतो. नेता, आमदार, मंत्री झालो ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका. एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्याला मोठे केले की पक्षही आपोआप मोठा होतो. आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढे चांगले, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.



शिवसेनेत होणार संघटनात्मक निवडणुका


एकनाथ शिंदे म्हणाले की, शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील. डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने अशा ७ टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. कुठेही लपवाछपवी नाही किंवा कुणाचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न होणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. संपूर्ण पारदर्शक पद्धतीने, निःपक्षपाती पद्धतीने निवडणुका होतील. मी मुख्य नेता असलो तरी आज निवडणुकीला रीतसर सामोरा जाणार. शाखाप्रमुख असो किंवा मुख्य नेता लोकशाहीत सगळेच समान आहे. निवडणुकांसाठी सज्ज व्हा, एकदिलाने काम करायचंय, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा. उमेदवार चुकला की संपलं. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. नोंदणी करताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करा. शाखा ही लोकांना आधार वाटते. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा. 'घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा' ही झालीच पाहिजे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक