आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात , अनेक सरकारी अधिकारी , लोकप्रतिनिधी , कर्मचारी आणि इतर नागरिक हे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतात . त्यासाठी ते वाटेल तेवढे शुल्क देण्यासाठी तयार असतात . अगदी मध्यम वर्गीय नागरिक सुद्धा कर्ज काढून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतात . याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारी शाळांमधील अपुऱ्या सुविधा आणि इंग्रजी भाषेची वाढलेली क्रेझ .या वातावरणात आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार संजय पुराम यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . संजय पुराम यांनी आपल्या लेकीला शासकीय आश्रम शाळेत घातले आहे .त्यांच्या या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे .


इंग्रजी माध्यमातील शिक्षण म्हणजे आपल्या मुलांसाठी सर्वकाही असा समाज अनेक पालकांनी करून घेतला आहे . मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते अगदी मध्यमवर्गियांपर्यंत सर्वजण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खासगी शाळेत मुलांचे नाव दाखल करतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. परंतु आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे . संजय पुराम यांनी आपल्या मुलीला गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा गावात असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत घातले आहे.हा निर्णय घेऊन त्यांनी सर्व पालकांसमोरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रपुढे एक आदर्श ठेवला आहे . त्यांच्या या निर्णयाने सरकारी शाळांचा कायापालट होण्यास मदत होईल , आणि इतर पालक देखील आपल्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्यास प्रवृत्त होतील .


विशेष म्हणजे,आमदार संजय पुराम यांनी स्वतःही आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपला मोठा मुलगा बिरसा संजय पुराम यालाही पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत पुराडा येथील आदिवासी आश्रम शाळेतच शिकवले. आता त्यांची लहान मुलगी समृद्धीलाही त्यांनी याच शाळेत घालून , सरकारी शाळांवर विश्वास दाखवला आहे.


जर याच पद्धतीने महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल केले, तर सरकारी शाळांचा कायापालट होईल . सरकारी शाळांमध्येही दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळू शकेल. तसेच कोणालाही आपल्या मुलांना खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालून लाखो रुपये खर्च करण्याची गरज भासणार नाही .

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना