व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या संकट काळामध्ये साथ देणारा सच्चा मित्र देखील आहे.अबू आझमीला बोलण्याची परवानगी असेल तर आ.संग्राम जगताप यांना हिंदुत्वावर बोलण्याचा हक्क आहे.महाराष्ट्रात संपूर्णपणे गोहत्या बंदी झाली पाहिजे आणि महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.लोकसभेचे व्होट जिहादचे उत्तर विधानसभेत हिंदूंनी एकत्रित येऊन दिले आहेत,आपल्या जमिनी आणि मंदिरे आपल्या नावावर करण्यासाठी संघटित होऊन लढा देण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे.



मी आता हळूहळू हिंदुत्वाकडे चाललो आहे.आणि संग्राम जगताप माझ्यापुढे गेले आहे. आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम माझे आहे.असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ.जगताप यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने महासभा संपन्न झाली.यावेळी खा.डॉ.विखे पाटील, ह भ प संग्रामबापू भंडारे,मंदार बुवा रामदासी अजिनाथ महाराज पालवे, राजेंद्र जंजाळ, रवी पडवळ,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी उपमहापौर गणेश भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संपत बारस्कर,माजी सभापती अविनाश घुले,आदींसह सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह भ प संग्राम बापू भंडारे म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचे काम सुरू केले असून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन मिळत आहे. जिहादी लोकांना आजहीअसे वाटते की काँग्रेस सरकार आहे. त्यांना माहीतच नाही आता हिंदूंचे सरकार आले आहे. सागर बेग म्हणाले की, खासदार निलेश लंके हे मुल्ला असून त्याला संसदेत पाठवले आहे, जिथे जिथे गोरक्षकावर गुन्हे दाखल झाले आहे, तिथे या मुल्लाने पोलिसांना फोन केले आहे. या मुल्लाने संसदेमध्ये वक्त बोर्डच्या बाजूने मतदान केले आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या