बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय कारकीर्दिला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली होती. हम पांच या मालिकेतून विद्याने प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.


झी मराठीवर 'कमळी' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. कमळीला ती शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.


 


यामध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. "भारताची आर्थिक राजधानी कोणती?" असं विचारताच कमळी मुंबई असं उत्तर देते. नंतर ती कमळीला मुंबईतील विमानतळाचं नाव काय, असं विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नावर मात्र कमळीची बोबडी वळते. कमळी आणि विद्याचा हा मजेशीर प्रोमो व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. विद्या बालनला कमळी मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आजपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये