Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. इंग्लंडमध्ये भारताने मालिका गमावली तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे अशी विनंती शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला केली आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिलला पराभवाचा सामना करावा लागला होता.


शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावले आणि कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पण त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण त्याच्यासाठी संस्मरणीय राहिले नाही. कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या पराभवानंतरही शास्त्री यांनी गिलचे कौतुक केले आहे आणि संघ व्यवस्थापनाला गिलला तीन वर्षे कर्णधारपदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.


रवी शास्त्री म्हणाले की, गिल खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो. पत्रकार परिषदेत, टॉसच्या वेळी ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे कर्णधार राहू द्या. मालिकेत काहीही झाले तरी काही फरक पडत नाही. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा आणि मला वाटते की, तो संघासाठी चांगले काम करेल.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना