आमची स्पर्धा विकासकामांशी : आमदार निलेश राणे

  54

पावशी येथे जिल्हास्तरीय शिवसेना मेळावा संपन्न


कुडाळ : पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आमची स्पर्धा कोणाशी नाही. कामांमध्ये आम्ही स्पर्धा करतो. काम जिंकलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आपले नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंद द्यायचा असेल तर, आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे. त्यामध्ये शिवसेना जिंकली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे.


आमच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं आता त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काम करणे क्रमप्राप्त आहे. कार्यकर्ता काही मागत नाही, पण आपण त्याला काही देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपले सहकार्य करणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री या ठिकाणी आले आहेत.


कार्यकर्ते, पदाधिकारी यांना असणाऱ्या अडचणी ते समजून घेणार आहेत,असे सांगून या ठिकाणी शिवसेनेचे हे चित्र सहज उभे राहिलेले नाही. त्यासाठी अनेकांना अंगावर घ्यावे लागले आहे त्यामुळे संघटना किती मजबूत आहे. हे दिसत आहे, असेही आमदार निलेश राणे म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रवेश सुद्धा घेण्यात आले.


यावेळी रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, निता कविटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, समन्वयक सचिन वालावलकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, अशोक दळवी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या

माझ्या जिल्ह्याच्या भविष्याशी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा अवैध व्यावसायिक आणि प्रशासनाला थेट इशारा कणकवली : सिंधुदुर्गातील युवकांच्या

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात