मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

  63

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार


जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आता त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. आगामी आंदोलन २९ ऑगस्टला मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज, रविवारी जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. बैठकीदरम्यान 'एक मराठा लाख मराठा', 'लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे', 'कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला' अशा घोषणाही देण्यात आल्या.


मराठ्यांची लाट काय असते, हे मुंबईत आल्यावर बघा, इथून १० ते १२ लाख लोक निघाले पाहिजेत, पाऊस पाणी बघू नका. फक्त तुम्ही सर्व जण माझ्या मागे राहा, मी बघतोच की हे आरक्षण कसे देत नाहीत. २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करायचं आहे. फक्त माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा, एक इंच सुद्धा मागे हटणार नाही. मराठ्यांनी आता हुशार व्हा, आपल्या बाजूने विजयाची चाहूल लागली आहे. त्यामुळे घरी थांबायचं नाही. तुमच्या ताकदीशिवाय कोणालाही विजय मिळवता येत नाही, आतापासून मुंबईला जाण्याच्या तयारी लागा, घरोघरी जाऊन सांगा, असं आवाहनही जरांगेंनी मराठा बांधवाना केलं आहे.


आंतरवलीतून २७ ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय असा मुंबईत जाण्याचा मार्ग असेल. याला पर्यायी मार्ग पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आणि मुंबई असा असणार आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ