अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

  91

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याचाही साखरपुडा झाला. विधानसभेच्या निवडणुकीत युगेंद्र हा अजित पवारांच्या विरोधात उभा राहिला. होता. निवडणुकीत युगेंद्रचा पराभव झाला. पण अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून युगेंद्रची चर्चा झाली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्रच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत.

युगेंद्र पवारच्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू असे आहे. तनिष्काने परदेशातून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा निवडक नातलगांच्या उपस्थितीत घरीच झाला. या साखपुड्याचे निवडक फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत तनिष्का हातातील अंगठी दाखवताना दिसत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाच्याला, युगेंद्रला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युगेंद्र आणि तनिष्का आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहा, खूप खूप शुभेच्छा. पवार कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. याआधी जय अजित पवार यांचा साखरपुडा झाला त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे साखरपुड्याची माहिती सर्वांना दिली होती.

पुण्यात १० एप्रिल २०२५ रोजी जय अजित पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला होता. ऋतुजा पाटील ही साताऱ्यातील फलटणच्या सोशल मीडिया कंपनी सांभाळणाऱ्या प्रविण पाटील यांची मुलगी आहे. या साखरपुड्याच्या निमित्ताने वाद विसरुन मुलांच्या आनंदासाठी पवार कुटुंब एकत्र आले होते.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’