किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर सेवा केंद्राने अत्यंत महत्वाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर ३० जुलै २०२५ रोजी ३.४ ते ३.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्य आपत्कालीन विभाग लोकांच्या सेवेसाठी सतर्क आहे. राज्यात गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ मीमी पाऊस झाला तर पालघर जिल्ह्यात १६.१ रत्नागिरी जिल्ह्यात १५.२ रायगड जिल्ह्यात ११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  त्यामुळे पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढू शक्यतो सतर्कतेचा इशारा म्हणून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आले आहेत


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला. 


गेल्या २४ तासात पुढील पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात शुक्रवार २८ जून पासून शनिवार २९ जून सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी मिलिमीटरमध्ये नोंद करण्यात आली. पुढील जिल्ह्यांमध्ये ठाणे ९.९, रायगड ११.९, रत्नागिरी १५.२, सिंधुदुर्ग १९, पालघर १६.१, नाशिक ४.६, धुळे ९.४, नंदुरबार १.६, जळगाव १.९, अहिल्यानगर ०.४, पुणे ५.५, सोलापूर०.१, सातारा ७.१, सांगली ०.३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड ०.१,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड गावात पावसामुळे डोंगराळ उतारावर जमिनीस भेग पडायला सुरवात झाली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. तरी दर ठिकाण भूस्खलन प्रवण असून, संततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेतेच्या दृष्टीने तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, त्यामुळे पर्यायी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.









Comments
Add Comment

आता 'हे' कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलन करणार

मुंबई : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे

मुंबई वगळता अन्य मनपा निवडणुका स्वबळावर - प्रफुल्ल पटेल

नागपूर : मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत

'काम होणार नसेल तर खुर्ची खाली करा': अजितदादांचा कामचुकार मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा; अजितदादा कोणावर भडकले?

नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

शेतक-यांच्या मागणीमुळे आता 'या' योजनेच्या निकषात करणार बदल

ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल

२० तलवारींसह मुस्लिम तरुणाला अटक, कोणता कट शिजत होता?

जळगाव : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या

पुणेकरांची iPhone १७ खरेदीसाठी तुफान गर्दी !

पुणे : पुण्यात ॲपलने अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरला पुणेकरांनी चांगलाच