Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  पोलिस यंत्रणा प्रभावी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तीन नवीन पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुणे शहरात करण्यात आल्या. पुण्यातील परिमंडळ दोन विभागाच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलिस प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली. वाहतूक विभागाचे  उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली.


कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी ?


 पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (DCP) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी वाहतूक (Traffic Police) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गृहविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बदल्या मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे,  एवढंच नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या काळात ही प्रक्रिया वेगवान केली जाऊ शकते जेणेकरून राज्यभरात पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल. त्यामुळे गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.







Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब