मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम राहणार असल्याचे चित्र आहे. वडखळ-पेण मार्गावरील उड्डाणपुलांवर पाणी साचण्याबरोबरच त्यांना तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला आणि उड्डाणपुलांना तडे गेले आहेत. पोलादपूरजवळील चांढवे, महाडजवळील नांगलवाडी, विसावा हॉटेल, नातेखिंड, वहूर, वीर रेल्वे स्टेशन, लोणारे खांब, पेण आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर सध्या मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, वडखळ येथून अलिबागकडे येणाऱ्या सेवारस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत.


पेणपासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आणि सदोष आखणीमुळे थोड्या पावसातही पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि खड्डे चुकवताना रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही महामार्गाची ही दुरवस्था कायम असल्याने, या खर्चावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये