मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. अशातच लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो ५ चा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला असून ठाणे-कल्याण-भिंवडी या ठिकाणी मेट्रो ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विस्तार उल्हासनगर, आणि अंबरनाथ पर्यंत  केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक देखील बोलवली होती.


भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण - भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिंवडी शहरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे स्थानिकांना कायमच वाहतून कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक समस्या आणि प्रवाशी यांच्यावरती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोसह रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यांसदर्भात आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. त्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


तसेच या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवला जाईल. त्यासंदर्भात विशेष समिती नेमून अभ्यास करतील त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.












Comments
Add Comment

Katrina Kaif Pregnancy : कुणी तरी येणार येणार गं! विकी-कतरिनाकडे लवकरच येणार गोड पाहुणा, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत

नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेकरिता १ ऑक्टोबरपर्यंत बेस्टतर्फे जादा बससेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील 'महालक्ष्मी यात्रा' या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.

राज्यात बीड, सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर/बीड: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :