अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निशाच्या म्हणण्यानुसार, गरोदर असताना, अगदी मृत बाळ जन्माला आल्याच्या दुःखद प्रसंगातही करणने तिला मारहाण केली.


मृत बाळाच्या जन्मानंतरही मारहाण


एका मुलाखतीत निशा रावलने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाबद्दल सांगितले. ती पाच-सहा महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात झाला. गर्भातील बाळाच्या हृदयात तीन छिद्रे होती आणि डॉक्टरांनी ते फार काळ जगणार नाही असे सांगितले होते. तब्बल २० तास प्रसूती वेदना सहन करून तिने मृत बाळाला जन्म दिला.


हा तिच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि दुःखद प्रसंग असतानाही, तिचा पती करण मेहराने तिला मारहाण केली, असा धक्कादायक खुलासा निशा रावलने केला आहे. या संपूर्ण काळात ती एकटीच रुग्णालयात गेली होती आणि तिच्यासोबत घरातील कोणीही नव्हते.


विवाहबाह्य संबंध आणि इतर आरोप


निशा रावलने प्रसारमाध्यमांशी बोलताना करणच्या दुसऱ्या मुलीशी असलेल्या अफेअरबद्दलही सांगितले. याच कारणामुळे तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. करणने तिला अनेकदा मारहाण केली असली तरी, आपल्या मुलासाठी ती आतापर्यंत गप्प राहिली होती. याशिवाय, करणने निशाचे दागिनेही विकल्याचा आरोप केला आहे.


मैत्रिणींचा दुजोरा


काही वर्षांपूर्वी करण आणि निशा यांच्यातील हे वाद सोशल मीडियावर चर्चेत असतानाच, निशाच्या मैत्रिणी कश्मीरा शाह आणि मुनीशा खटवानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. अभिनेत्री कश्मीरा शाहच्या म्हणण्यानुसार, करणने निशाला याआधीही मारहाण केली होती.

Comments
Add Comment

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी