Stock Market Update: सेन्सेक्स २६.६७ व ३७.०५ अंकाने वाढला ! सकारात्मक सुरुवात तेजीचे संकेत?

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज किरकोळ वाढच अपेक्षित आहे. प्रामुख्याने सकाळी गिफ्ट निफ्टीत ०.४२% वाढला होता. सकाळी ९.३० वाजेपर्यंत त्यामध्ये घट होत ०.१% वर पोहोचला असल्याने सेन्सेक्स (Sensex) व निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे.सेन्सेक्स २६.६७ अंकांनी वाढला असून निफ्टीत ७.९० अंकांची भर पडली आहे. काल जागतिक बाजारपेठेत वाढ झाली होती. अमेरिकन बाजारातील डाऊजोन्स (Dow Jones) ०.२७%, एस अँड पी ५०० (S&P500) ०.८०%, नासडाक (NASDAQ) बाजारात ०.९७% वाढ झाल्याने बाजारात आपसूकच दोलायमान उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३७%,०.३६% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४८%, ०.५७% वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज पुन्हा एकदा स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी गुरूवारच्या आधी सलग दोनदा स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली होती. तर मिडकॅपही तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक होता. आज सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६०.७४ अंकाने घसरण झाली आहे तर बँक निफ्टीत ११०.८० अंकाने घसरण झाली आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये घसरण फायनांशियल सर्विसेस (०.४८%), खाजगी बँक (०.३३%), रिअल्टी (०.१४%) या समभागात घसरण झाली आहे तर इतर समभागात वाढ झाली. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.८५%), तेल व गॅस (०.३७%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.६०%), हेल्थकेअर (०.२३%), मेटल (०.९२%), आयटी (०.४९%) समभागात झाली आहे. यामुळे आज क्षेत्रीय निर्देशांकात विशिष्ट क्षेत्रीय कामगिरीवर आधारित परिणाम कायम राहू शकतो.


आज वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index VIX) १.४६% टक्के उसळल्याने बाजारातील सपोर्ट लेवलवर दबाव कायम राहिला आहे. इराण व इस्त्राईल यांच्यातील युद्धाविरामामुळे बाजारातील भावना सकारात्मक असल्यातरी जागतिक अस्थिरतेची पातळी कायम आहे. किंबहुना कच्च्या तेलाच्या किंमती सपाट राहिल्या असून सकाळपर्यंत सोन्याच्या (०.५३%) व चांदीच्या (०.५३%) दरात घसरण झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपयाची पुन्हा एकदा २१ पैशांनी घसरण झाल्याने बाजारातील दबाव कायम राहू शकतो. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात बाजारातील खरेदी वाढवली असली तरी घरगुती गुंतवणूकदारांनी हवी तितकी रोख खरेदी वाढवलेली नाही. कालच्या आकडेवारीनुसार घरगुती गुंतवणूकदारांनी (DII) १४२२४.९४ कोटींची रोख खरेदी केली आहे तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) यांनी १९४२५.६८ कोटींची रोख खरेदी केली.


आशियाई बाजारातील देखील काल वाढ कायम होती. खासकरून अमेरिकन बाजारातील टेक (Technology) समभागात वाढ झाल्याने आशिया बाजारात बुलिश वातावरण कायम होते. निकेयी (Nikkei 225) यामध्ये १.५७% वाढ झाली होती तर स्ट्रेटस टाईम्स (Straits Times) मध्ये ०.६४% वाढ झाली. मात्र शांघाई कंपोझिट (Shanghai Composite) मध्ये ०.२१% घसरण झाली होती. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता मावळल्यानंतर गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील फोकस मजबूत 'फंडामेंटल' कडे राहू शकतो. अमेरिका-चीन करारानंतर नोव्हेंबर २०२१ नंतर एमएससीआय आशिया-पॅसिफिक (MCI Asia Pacific Index) निर्देशांकाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्यापार चिंता कमी करून टॅरिफ विराम देण्याची अंतिम मुदत वाढवू शकतात असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. आगामी काळात भारताशीही हा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरच बाजारात तेजीचीच चाहूल कायम आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ऐकझो नोबेल (Akzo Nobel) (६.५%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.७३%), अपार इंडस (३.४६%), ब्रेनबिज (३.३३%),गॉडफ्रे फिलिप्स (३.०७%), हिन्दुस्तान कॉपर (२.७४%), जेएसडब्लू होल्डिंग्स (२.७३%), टोरंट फार्मा (२.५१%), सिमेन्स (२.४८%), नुवामा वेल्थ (२.१७%), सिमेन्स (२.४८%), वेदान्ता (२.१६%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.५७%), अदानी ग्रीन एनर्जी (२.९६%), टोरंट फार्मा (२.४५%), अदानी एनर्जी सोल्यूशन (२.१२%), अदानी एंटरप्राईजेस (१.४४%), टाटा स्टील (१६२.५३%) या समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण अलकाईल अमाईन्स (Allkyl Amines) (२.४८%), वेल्सस्पून लिविंग (१.९५%), जेके सिमेंट (१.९५%), मुथुट फायनान्स (१.६६%),क्रिष्णा इन्स्टिट्यूट (१.५४%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.४६%), चोलामंडलम फायनान्स (१.४५%),महाराष्ट्र स्कूटर्स (१.३६%), रामकृष्ण फोर्ज (१.३४%), सिप्ला (१.०४%), बजाज फिनसर्व्ह (२.०८%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.८६%),ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.०६%), इटर्नल (०.९०%), होंडाई मोटर्स (०.८८%), इंडियन हॉटेल्स कंपनी (०.७८%), स्विगी (०.७५%), कोटक महिंद्रा बँक (०.७५%), श्रीराम फायनान्स (०.७४%), ओएनजीसी (०.२४%) या समभागात झाली आहे.


त्यामुळे एकंदरच आजची परिस्थिती पाहता बाजारात वाढ अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला