Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले. 


पुणे:  दुबईहून पुण्याला येणारे स्पाइसजेटचे (एसजी-५०) विमान प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात दाखल झाले. पुण्यात दाखल झाल्यावर प्रवासी बॅगेज बेल्टजवळ सामानाची वाट पाहत थांबले होते. बराच वेळेनंतरही सामान येत नसल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. विमानात इंधनाचा साठा वाढल्याने भार पेलण्याची विमानाची क्षमता संपली, त्यात पुन्हा सामानाचा भार नको म्हणून बॅगेज आणले नसल्याचे स्पाइसजेटने सांगितले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सकाळी पुणे विमानतळावर घडली. ((SpiceJet Flight From Dubai Lands In Pune Without Luggage))


या विमानात सुमारे १४० प्रवाशी होते, ज्यांचे सामान विमानात भरलेच नसल्याचे आढळले. ज्यामुळे अनेक प्रवासी संतापले, तर अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला.


दुबईहून रात्री १२.०५ वाजता निघणाऱ्या या विमानाने मुळातच उशिरा उड्डाण केले, तब्बल दोन तासांनी म्हणजे पहाटे २ वाजता या विमानाने उड्डाण केले, जे सकाळी ६.४० वाजता पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर आधीच त्रासलेल्या प्रवाशांना त्यांचे सामान दुबई विमानतळावरच राहिल्याचे आढळल्यामुळे पुणे विमानतळावर सकाळच्या प्रहरी एकच गोंधळ पाहायला मिळाला. यादरम्यान, स्पाइसजेटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रवाशांनी अनेक प्रयत्न केले गेले पण त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. ग्राउंड हँडलिंग आउटसोर्सच्या हवाल्यानुसार प्रवाशांना कोणतीही औपचारिक तक्रार पावती देण्यात आली नव्हती.


Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग