Kolhapuri Chappal Controversy : प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा रुबाब! तर, इटालियन 'प्राडा'वर चोरीचा आरोप... काय आहे नेमकं प्रकरण?

'भारताला श्रेय नाही'... नेटिझन्स पेटले


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. ‘प्राडा स्प्रिंग समर २०२६’ हा मिलान येथील शो सध्या जोरदार चर्चेत आला आहे. इटलीमध्ये झालेल्या या शोमध्ये Prada या सुप्रसिद्ध कंपनीचे मॉडेल कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक करताना दिसले. वरवर पाहता ही कौतुकाची बाब वाटत असली, तरी आता प्राडावर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही चप्पल एक लाख रुपयांना प्राडाकडून विकली जात आहे. त्यामुळे एकीकडे यावरून मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.




नेमका कोल्हापुरी चपलांचा वाद काय?


इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये 'प्राडा'नं आपल्या ‘मेन स्प्रिंग समर २०२६ कलेक्शन’मधील वेशभूषा सादर केल्या. त्यात प्राडाचे मॉडेल चक्क कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्पवॉक करताना दिसल्याच पाहायला मिळालं. या चपलांची किंमत Prada कडून तब्बल १ लाख रुपये लावण्यात आली आहे. पण कोल्हापूरची ओळख मानली जाणारी कोल्हापुरी चप्पल प्राडानं थेट त्यांच्या कलेक्शनचा भाग म्हणून विदेशातील फॅशन शोमध्ये सादर केल्यामुळे त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतात ५०० ते १५०० रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलेची नक्कल केलेल्या प्राडाच्या चपलेची किंमत मात्र एक लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीवर टीका देखील होत आहे.





महाराष्ट्रातील राज्यातील कोल्हापूर शहरातील 'कोल्हापुरी'


एक्सवर एका यूजरने म्हटले, की प्राडा एसएस २६ मध्ये कोल्हापुरी चप्पलेचे सादरीकरण करण्यात आले असून ती मुळची भारतातील महाराष्ट्रातील राज्यातील कोल्हापूर शहरातील कारागिरांची निर्मिती आहे. स्कॅन्डिनेव्हियन स्कार्फप्रमाणेच परदेशातील फॅशन उद्योग हा पुन्हा एकदा भारतीय फॅशनची चोरी करत आहे, असे नेटिझन्सने म्हटले आहे. प्राडा आता शेकडो डॉलरमध्ये कोल्हापुरी चप्पलची विक्री करत असताना ही कलाकृती जीवंत ठेवणाऱ्या कारागिरांना कोणतेही श्रेय मिळत नाही आणि मानधनही नाही, अशी टिपणी अन्य एका नेटिझन्सने केली आहे.हस्तनिर्मित चामड्याची थोंग चप्पल? कोल्हापुरी चप्पलेला कोणतेही जिओ टॅगिंग नाही का? ते आपला वारसा चोरू शकतात आणि ते वेडे कोणत्याही किमतीवर विक्री करू शकतात? अशा शब्दांत अन्य एकाने नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत