Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

  57

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली आहे. जगभरातील लोक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव उत्साहाने पाहतात. या यात्रेची समाप्ती मंगळवार, ८ जुलै रोजी होणार असून ही यात्रा १२ दिवस चालते. या १२ दिवसांतील प्रत्येक दिवसाला खास महत्त्व आहे.



रथयात्रेसाठी काय आहे शुभ मुहूर्त


यंदा आजपासून आषाढ शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार, २७ जून आहे. या दिवसापासून रथयात्रेची सुरुवात होत आहे. पंचांगानुसार, २७ जून रोजी सकाळी ५.२५ ते ७.२२ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे. या योगानंतर पुष्य नक्षत्र आहे. आजचा अभिजित मुहूर्त रात्री ११.५६ ते १२.५२ पर्यंत आहे. याच काळात प्रभूची यात्रा सुरु होणार आहेत.





आजपासून रथयात्रेची सुरुवातीची विधी


रथयात्रेच्या पहिल्या दिवशी पुरीचा राजा स्वतः ‘छेरा पन्हारा’ यावेळी विधी करतो. ज्यामध्ये तो रथाचा खालचा भाग सोनेरी झाडूने स्वच्छ करतो. याला नम्रता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते. ‘हेरा पंचमी’च्या दिवशी देवी लक्ष्मी गुंडीचा मंदिरात जाते आणि प्रभूने तिला का सोडले याबद्दल नाराजी व्यक्त करते. ही घटना संपूर्ण प्रवासाला आणखी मनोरंजक बनवते.



रथयात्रेमधील दोरींनाही खास नावे


जगन्नाथ रथयात्रेमध्ये ओढल्या जाणाऱ्या तीन दोऱ्यांनाही स्वतःची अशी नावे आहेत. त्यातील भगवान जगन्नाथाच्या १६ चाकी रथाला नंदी घोष असे म्हटले जाते. नंदी घोष या रथाच्या दोरीचे नाव शंखचूड नाडी असे आहे. दुसरे बलभद्र याच्या १४ चाकांच्या रथाला तलध्वज असे म्हणतात. तलध्वज या रथाच्या दोरीला बासुकी या नावाने ओळखले जाते. तसेच तिसरी दोरी म्हणजेच सुभद्रेचा १२ चाकी रथ याला दर्पदलन असे म्हटले जाते. दर्पदलन या रथाच्या दोरीला स्वर्णचुडा नाडी या नावाने देखील ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या दोऱ्या केवळ रथ ओढण्याचे साधनच नाही तर त्याला स्पर्श करणे म्हणजे भाग्य आहे, असे मानले जाते.


दरम्यान, एकटा व्यक्ती हा रथ जास्तवेळ ओढू शकत नाही. यावेळी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला संधी मिळावी म्हणून हे केले आहे. जरी तुम्ही रथ ओढू शकला नाहीत तरी काळजी करण्याची गरज नसते. कारण असं म्हंटल जातं की, खऱ्या मनाने सहभागी झाल्याने यज्ञांइतकेच पुण्य मिळते.

Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.