राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्त नव्याने २ पोलीस उपयुक्त येणार आहे तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी ५१ पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहे. या बदल्यांमध्ये नासिक पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव यांची नासिक वरून नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर येथे बली करण्यात आलेली आहे तर नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पोलीस अधीक्षक या पदावरती बदली करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा वलावडकर यांची छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपयुक्त या पदावर बदली करण्यात आलेली आहे तर गुप्तवार्ता विभागामध्ये कार्यरत असलेले गीता चव्हाण यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आलेली आहे.


नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा विभागामध्ये गुप्तवार्ता या पदावरती कार्यरत असलेले योगेश चव्हाण यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात उपयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. धुळे येथे अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती कार्यरत असलेले किशोर काळे यांची बदली नाशिक शहरात पोलीस उपयुक्त या पदावर करण्यात आलेली आहे. तर अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत असलेले प्रशांत खैरे यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती करण्यात आलेली आहे तर अनिकेत भारती हे आस्थापनाच्या प्रतीक्षेत असलेले त्यांची नियुक्ती गुप्त वार्ता विभागाच्या उपयुक्त पदी करण्यात आलेली आहे नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागामध्ये कार्यरत असलेले अण्णासाहेब जाधव यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज येथे करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये कार्यरत असलेले प्रदीप जाधव यांची बदली मुक्त वार्ता अमरावती येथे करण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून